Actor Vijay fined Rs 1 lakh

सुपरस्टार विजय याला १ लाख रुपयांचा दंड, न्यायमूर्तींनी केली ‘ही’ टिपण्णी

देश मनोरंजन

चैन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याने २०१२ मध्ये इंग्लंडवरून एक महागडी गाडी मागवली होती. या गाडीची किंमत ७ कोटी ९५ लाख रुपये होती. मात्र गाडी विकत घेताना विजयने गाडीसाठी द्यावा लागणारा कर भरला नाही, तर करमाफी मिळावी यासाठी त्याने सरकारकडे विनंती केली होती. आता यावर मद्रास न्यायालयाकडून निर्णय आला असून अभिनेत्याला कर न भरल्यामुळे १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम यांनी ही करमाफीची याचिका फेटाळून लावत अभिनेता विजयला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पुढच्या दोन आठवड्यांमध्ये हा दंड तामिळनाडू मुख्यमंत्री कोविड- १९ मदत निधीमध्ये टाकण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले. याशिवाय त्याला दोन आठवड्याच्या आत गाडीचा कर भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

न्यायमूर्तींनी यावेळी टिपण्णी केली की, अभिनेत्याने आपल्या सिनेमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. पण खऱ्या आयुष्यात मात्र तो असं काही करताना दिसत नाही. कर भरणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि दान करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे.

ढगफुटीनंतर बेपत्ता झालेले सूफी गायक मनमीत सिंग यांचा मृतदेह सापडला, चाहत्यांना मोठा धक्का

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत