The body of Sufi singer Manmeet Singh found, who went missing after the cloudburst

ढगफुटीनंतर बेपत्ता झालेले सूफी गायक मनमीत सिंग यांचा मृतदेह सापडला, चाहत्यांना मोठा धक्का

मनोरंजन

धरमशाला : सोमवारी धरमशालामध्ये ढगफुटी झाल्यानंतर बेपत्ता झालेले सूफी गायक मनमीत सिंग यांचा मृतदेह सापडला आहे. मनमीत यांच्या मुत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून हा त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. मनमीत पंजाबच्या अमृतसरमधील होते. मनमीत यांच्या मृत्यूमुळे ‘सैन ब्रदर्स’ ची जोडीही फुटली. मंगळवारी संध्याकाळी उशिरा कांग्रा येथील कारेरी तलावाजवळील एका खड्ड्यात मनमीत यांचा मृतदेह सापडला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मनमीत सिंग हे त्यांचा भाऊ कर्णपाल आणि काही मित्रांसह धरमशाला येथे फिरायला गेले होते. रविवारी सर्वजण धरमशाला येथून कारेरी तलावाकडे गेले. रात्री पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वजण तिथेच थांबले. सोमवारी धरमशालामध्ये ढगफुटी झाली तेव्हापासून मनमीत बेपत्ता झालेले होते. पोलीस आणि बचाव पथकाचे जवान सातत्याने त्यांचा शोध घेत होते. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी सांगितले की सोमवारी सकाळी ते सर्वजण परतत असताना खड्डा ओलांडताना मनमीत पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना त्या भागात शोधण्याचा प्रयत्न सुरू होता.

कारेरी गावात मोबाईल सिग्नल नसल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने मनमीत सिंग यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. तेथे स्थानिक प्रशासनाशीही संपर्क साधला गेला. यानंतर मंगळवारी सायंकाळी बचाव पथकाला मनमीत सिंग यांचा मृतदेह खड्ड्यात सापडला. त्यानंतर त्यांचा मृतदेह धरमशाला येथे आणण्यात आला. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना दुःख अनावर झाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत