नवी दिल्ली : अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन झाले आहे. आज (23 एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमित मिस्त्री यांचे निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. अमित यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
अमित टीव्ही आणि बॉलिवूडमधील नामांकित अभिनेता होता. अमित यमला पगला दिवाना, शोर इन द सिटी, एक चालीस लास्ट लोकल, शशश.. कोई है आणि बंदिश बॅन्डिट्स अशा अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिसला आहे. लवकरच तो सैफ अली खानच्या मल्टीस्टारर फिल्म ‘भूत पोलिस’ मध्ये दिसणार होता, परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने या जगाचा निरोप घेतला.
अमितचे मॅनेजर महर्षि देसाई यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले कि, “मला धक्का बसला आहे. तो एकदम ठीक होता आणि त्याच्या घरी होता. तो ठणठणीत होता आणि त्याची आरोग्याशी संबंधित कोणतीही तक्रार नव्हती किंवा त्याला कोणतीही समस्या जाणवली नव्हती. नाश्ता केल्यानंतर अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात नेण्याइतका वेळही मिळाला नाही. त्यांच्यासारखा अभिनेता हरपणे हे मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान आहे.”
सिने अँड टीव्ही आर्टिस्टस असोसिएशनने (सीआयएनटीएए) अमित मिस्त्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि अधिकृत ट्विटर हँडलवरून अभिनेता अमितला श्रद्धांजली वाहिली. अमितच्या जाण्याने जॅकलिन फर्नांडिज, कुब्रा सेठ, शेखर सुमनसह सर्व सेलेब्रिटींना मोठा धक्का बसला आहे.
#CINTAA expresses its deepest condolence on the demise of #AmitMistry (Member since 2004) @Djariwalla @actormanojjoshi @amitbehl1 @SuneelSinha @deepakqazir @NupurAlankar @abhhaybhaargava @sanjaymbhatia @rajeshwarisachd @neelukohliactor @JhankalRavi @rakufired @GhanshyamSriv19 pic.twitter.com/poax6xRUkx
— CINTAA_Official (@CintaaOfficial) April 23, 2021




