मुंबई : ‘मिर्झापूर-2’ वेबसिरीजमध्ये ललितची भूमिका साकारणारा ब्रह्म मिश्रा याचे त्याच्या अंधेरीतील राहत्या घरात निधन झाले आहे. गेल्या चार वर्षापासून तो मुंबईतील अंधेरी येथे भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबरला त्याच्या छातीत दुखत होतं, त्यामुळे तो डॉक्टरांकडेही गेला होता. डॉक्टरांनी त्याला गॅसेसची […]
टॅग: Actor
ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान, मुंबईत पार पडली शस्त्रक्रिया
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती मिळाली आहे. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकर उपचार घेऊन पुन्हा घरी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर मुंबईतील एच […]
‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे १९ मे रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत जोशी यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. हेमंत जोशी यांनी ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेत भावेंची भूमिका साकारली. हेमंत जोशी यांनी जवळपास दोन दशके नाटक, सिनेमा आणि मालिकेत काम केलं. त्यांनी नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, तेंडल्या, […]
सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण
साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लू अर्जुनने स्वतः सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. तो सध्या विलगीकरणात आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं कि, ”हॅलो एव्हरीवन, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. सगळ्यांना विनंती आहे जे माझ्या संपर्कात आले त्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची […]
प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा
नवी दिल्ली : अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन झाले आहे. आज (23 एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमित मिस्त्री यांचे निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. अमित यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अमित टीव्ही आणि बॉलिवूडमधील नामांकित अभिनेता होता. अमित यमला पगला दिवाना, शोर इन द सिटी, एक चालीस लास्ट लोकल, शशश.. कोई […]
अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण
अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. सोनूने म्हटले आहे कि, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही, उलट, आपल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, मी नेहमीच तुमच्याबरोबर […]
अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण, नीतू कपूर यांनी दिली माहिती
अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्याची आई नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. नीतू कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रणबीरला कोरोनाची लागण झाली असून सध्या तो औषधे घेत आहे. तसेच त्याला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे नीतू कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. View […]
रंगभूमी, चित्रपट सृष्टीने मार्गदर्शक, चतुरस्र अभिनेता गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवणारा, चतुरस्र अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोघे यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांपैकी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत […]
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन
पुणे : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता होते. त्याशिवाय ते चित्रकार आणि वास्तुविशारद होते. तसेच उत्तम सुगम संगीत गायकही होते. श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन […]
अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण
मुंबई : प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे रिओपनिंगचे प्रयोग त्यांनी रद्द केले आहेत. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. मला डॉक्टरांनी सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मी नाटकाचे दोन प्रयोग रद्द केले आहेत. पिंपरीचा प्रयोग करुन […]