Cabinet Lifts Ban On Dearness Allowance & Likely To See 11% Hike
अर्थकारण देश

मोठी बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तसेच हा महागाई भत्ता तीन टप्प्यांत मिळून ११ टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसंच पेन्शनधारकांनाही होणार आहे. महागाई भत्त्याचा दर १७ टक्क्यांहून वाढून २८ टक्क्यांवर करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या वर्षी कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीला एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या महागाई भत्त्याचे दोन हप्ते रोखण्याचा निर्णय घेतला होता. महागाई भत्याचा हप्ता प्रत्येक सहा महिन्यांनी जारी केला जातो. वर्षात पहिल्यांदा १ जानेवारी आणि दुसरा १ जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो. आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासून लागू होणाऱ्या तीन हप्त्यांवरील स्थगिती मागे घेण्यात आली आहे. यानंतर तीन हफ्ते मिळून एकूण ११ टक्के वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसंच पेन्शनधारकांनाही होणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत