राजस्थान : एका खाजगी वसतिगृह मालकाने १० वर्षांच्या चिमुकलीवर महिनाभर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वसतिगृह मालकासह चौघांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, पीडिता आपल्या धाकट्या भावासह शिक्षणासाठी या वसतिगृहात राहत होती. या काळात वसतिगृह मालक मुकेश गुर्जर हा रात्रीच्या वेळी […]
टॅग: sexual assault
नाशिकमध्ये खळबळ! वडिलांकडून मुलीवर बलात्कार, डीएनए चाचणीनंतर धक्कादायक खुलासा…
नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा बिहारचा आहे. तो कुटुंबीयांसोबत नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. दरम्यान, पीडित मुलीची आई सतत गावाला […]
पुणे : 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुणे : रात्रपाळीसाठी कामावर निघालेल्या 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने पीडितेला दिली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. […]
पुण्यात २७ वर्षीय तरुणीवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार
पुणे : पुण्यात लैंगिक अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूतानमधील एका २७ वर्षीय तरुणीवर सात पुरूषांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही तरुणी २०२० मध्ये कामाच्या शोधात भारतात बोधगया येथे आली. त्यानंतर ती पुण्यात राहायला आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख आरोपींपैकी एक असलेल्या ऋषिकेश नवलेशी झाली होती, ज्याने तिची ओळख त्याचा मित्र […]
ठाणे हादरलं! १३ वर्षीय कर्करोग पीडित मुलीवर बलात्कार करून केले गर्भवती, आरोपीला अटक
ठाणे : ठाणे जिल्ह्यात एका १३ वर्षीय कर्करोग पीडित मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी, पोलिसांनी २९ वर्षीय आरोपीला गुरुवारी बिहारमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब आणि आरोपी बिहारमधील एकाच गावातील आहेत. ही मुलगी बिहार राज्यातून महाराष्ट्रात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी […]
‘स्तन पकडणे आणि पायजमाची दोरी तोडणे बलात्कार नाही’, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ‘असंवेदनशील’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशात दिलेल्या निरीक्षणांना बुधवारी (२६ मार्च) स्थगिती दिली, ज्यामध्ये म्हटले होते की केवळ स्तन पकडणे आणि पायजमाची दोरी तोडणे हे बलात्कार नाही. न्यायाधीश बी.आर. गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की उच्च न्यायालयाच्या आदेशात केलेल्या काही निरीक्षणांमध्ये संपूर्ण असंवेदनशीलता आणि अमानवी दृष्टिकोन दिसून […]
स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाला महिना उलटूनही अद्याप आरोपपत्र दाखल नाही
पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. २५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. मात्र, घटनेला एक महिना उलटून गेला तरीही गाडे याच्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र अद्याप दाखल झालेले नाही. तसेच गाडेची डीएनए चाचणी करण्यात आली, या चाचणीचा अहवाल […]
पुणे : १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पिठगिरणी कामगाराला अटक
पुणे : एका पीठ गिरणी कामगाराने शाळेत निघालेल्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोली येथे ही घटना घडली असून वाघोली पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. २५ मार्च रोजी झालेल्या या गुन्ह्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वाघोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, […]
बलात्कार करणाऱ्यांचे भटक्या कुत्र्यांप्रमाणे नपुंसकीकरण करायला हवे, राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे वक्तव्य
मुंबई : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी बलात्कार करणाऱ्यांची तुलना भटक्या कुत्र्यांशी करत त्यांचे नपुंसकीकरण करायला हवे असे वक्तव्य केले. त्यांनी हे विधान भरतपूर बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात न्यायिक अधिकारी, वकील आणि इतर मान्यवरांना संबोधित करताना केले. राज्यपाल बागडे यांनी महाराष्ट्रातील एक उदाहरण देत म्हटले कि, जिथे एका स्थानिक नागरी संस्थेने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण […]
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी संताप व्यक्त, केली ‘ही’ मागणी
पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये २६ वर्षीय महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर या घटनेवर टीका केली आहे आणि म्हटले आहे की, ही घटना गुन्हेगारांना कायद्याची भीती नसल्याचे दर्शवणारी आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स वर एक पोस्ट टाकली आहे. […]










