देश

महागाईचे चटके! उद्यापासून पेट्रोल-डिझेल महागणार

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आणखी वाढ होणार आहे. सोमवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून म्हणजेच 8 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सध्याची स्थिती पाहता, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.90 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 15.80 रुपये प्रति लिटर आहे. 2014 मध्ये, पेट्रोलवर 9.48 रुपये आणि डिझेलवर 3.56 रुपये उत्पादन शुल्क होते. यानंतर हे शुल्क अनेक वेळा वाढवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, 2021 मध्ये पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 27.90 रुपये आणि डिझेलवरील 21.80 रुपये प्रति लिटर झाले होते.

मे 2022 मध्ये, केंद्र सरकारने काही प्रमाणात दिलासा देत पेट्रोलच्या किमतीत 8 रुपये आणि डिझेलच्या किमतीत 6 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर सध्याचे दर लागू झाले. सध्यातरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमती 32 रुपये प्रति लिटर आहेत, त्यावर 33 रुपये उत्पादन शुल्क आकारले जाते. या दरावर राज्य सरकारांनी आपापल्या व्हॅट आणि उपकराची अतिरिक्त रक्कम लावली आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तीन पटींनी वाढतात.

सध्याच्या परिस्थितीवरून, नवीन उत्पादन शुल्क वाढीमुळे इंधनाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच, इंधनाच्या किमतींमध्ये होणारी ही वाढ नागरिकांसाठी आर्थिक ताण निर्माण करू शकते.

वर्तमान दर:

नवी दिल्ली: पेट्रोल – ₹94.72, डिझेल – ₹87.62

मुंबई: पेट्रोल – ₹104.21, डिझेल – ₹92.15

कोलकाता: पेट्रोल – ₹103.94, डिझेल – ₹90.76

चेन्नई: पेट्रोल – ₹100.75, डिझेल – ₹92.34

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत