Optimist Asian and Oceanian Sailing Championship inaugurated, India to host after 19 years
क्रीडा महाराष्ट्र मुंबई

‘ऑप्टिमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे उद्घाटन, १९ वर्षानंतर भारताला यजमानपद

मुंबई : तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या ऑप्टिमिस्ट एशियन अँड ओशिनियन नौकानयन चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेचे उद्घाटन आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्रिय मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल हरमिंदर सिंग कहलॉन यांच्या हस्ते आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. गुरुवार 15 डिसेंबरपासून मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सन 2003 नंतर भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन, जपान, श्रीलंका, थायलंड, युएई, बेल्जियम, मॉरिशस, तुर्की, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया या 13 देशांनी सहभाग घेतला आहे. आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सेल ऑप्टीमिस्ट, यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (वायएआय) आणि नॅशनल ऑप्टीमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एनओएए) यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. सर्व 10 शर्यती दररोज प्रति फ्लीट जास्तीत जास्त तीन शर्यतींसह आयोजित केल्या जातील. 19 डिसेंबर 2022 रोजी ठाकर्स, चौपाटी, मुंबई येथे स्पर्धेचा समारोप होईल.

उद्घाटनप्रसंगी से. नि. कॅप्टन अजय नारंग, विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भरत नाट्यम नृत्यकलेचे सादरीकरण करण्यात आले. यादरम्यान स्पर्धेत जगभरातील 13 सहभागी देशातील 105 खलाशी आणि प्रशिक्षकांचा परिचय देण्यात आला. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, उपसचिव सुनील हांजे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत