मुंबई : अंधेरी येथील उपनगरी भागात मेट्रो रेल्वेच्या खांबाला चुकून झालेल्या अपघातात क्रेनचा काही भाग खाली कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील गुंडावली बसस्थानकाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
जोगेश्वरीहून वांद्रेकडे जात असताना क्रेनच्या चालकाचा ताबा सुटला. ती मेट्रो रेल्वेच्या खांबाला धडकली. क्रेनचा काही भाग खाली पडल्याने बसस्टॉपवर थांबलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन जण जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर क्रेनचा चालक घटनास्थळावरून पळून गेला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई, अंधेरी येथील मेट्रो रेल्वेच्या खांबाला चुकून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील गुंडावली बसस्थानकाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलीस अधिकारी म्हणाले. pic.twitter.com/tIUCsn3eNn
— थोडक्यात घडामोडी : MARATHI NEWS – मराठी बातम्या (@thodkyaatnews) October 31, 2020