उत्तराखंड : यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गाची सुरक्षा भिंत कोसळल्याने सुमारे 10,000 लोक अडकले असल्याची माहिती आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असून, महामार्गालगत विविध ठिकाणी 10 हजार लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता पुन्हा खुला होण्यासाठी 3 दिवस लागू शकतात. जिल्हा प्रशासन काही छोट्या वाहनांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दूरवरून मोठ्या वाहनांमध्ये आलेल्या लोकांना बाहेर पडणे शक्य नाही. यमुनोत्री धामकडे जाणाऱ्या महामार्गावर पुढील तीन दिवस मोठ्या वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.




