The woman was gang-raped in her own house

महिलेवर तिच्याच घरात घुसून सामूहिक बलात्कार

देश

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दुबौलिया परिसरात सामूहिक बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी घरात घुसून ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीच्या हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप पीडितेने या आरोपींवर केला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातीलच चार जण १० डिसेंबर रोजी या महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला. विरोध केला असता महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींवर या महिलेने आणखी एक आरोप केला आहे. पतीची हत्या करून मृतदेह गायब केल्याची तक्रार तिने याआधीही या आरोपींविरोधात केली होती. त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून सर्वांची जामिनावर सुटका झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत