महिला टी -20 चॅलेंजचा अंतिम सामना हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवाज आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स यांच्यात सायंकाळी 7.30 वाजता शारजाह येथे खेळला जाईल. गेल्या दोन हंगामात विजेतेपद जिंकलेल्या सुपरनोवाज ला हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर ट्रेलब्लेझर्सना प्रथम चॅम्पियनशिप मिळवायची आहे.
हंगामातील तिसर्या सामन्यात सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स संघ समोरासमोर आले होते. त्या रोमांचकारी सामन्यात हरमनप्रीतच्या संघाने मंधानाच्या संघाचा 2 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. सुपरनोवाज संघाच्या या विजयासह मिताली राजचा व्हेलॉसिटी संघ स्पर्धेबाहेर पडला.
सुपरनोवाज ने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 अंतिम सामन्यासह 4 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. ट्रेलब्लेझर्सने आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आणि 3 गमावले आहेत.
शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.