Ashock chawan
महाराष्ट्र मुंबई राजकारण

अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, काँग्रेसच्या महापालिकांना उद्धव ठाकरेंकडून निधी मिळत नाही..

मुंबई : काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अशोक चव्हाण यांना यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी केलेले खड्डे बुजवण्याचं काम माझ्याकडे असून तेच मी करत आहे. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाही तर कारने फिरत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

अशोक चव्हाण यांनी यावेळी पुन्हा एकदा शिवसेनसोबत महाआघाडी करण्यासंबंधी खुलासा करत दिल्लीतील नेते नाराज होते असं सांगितलं. शिवसेनेसोबत जाण्याबद्दल दिल्लीमधील नेत्यांमध्ये नाराजी होती. दुसरीकडे राज्यात भाजपाकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेल हे मी स्वतः जाऊन दिल्लीतील नेत्यांना पटवून दिलं. यानंतरच आपण महाविकास आघाडीत सामील झालो,असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत