मुंबई : राज्यात कोविड-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड-19 टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. वाढत्या रुग्णांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी ६ वाजता कोविड टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. बुधवारी महाराष्ट्रात 1,081 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदवली गेली, जी 24 फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक दररोजची वाढ आहे, […]
टॅग: COVID-19
पीएम केअर फॉर चिल्ड्रेन : कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोठी भेट, योजनेचे तपशील जाणून घ्या
नवी दिल्ली : मार्च 2020 मध्ये देशात आणि जगामध्ये कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मुले अनाथ झाली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली […]
IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ क्वारंटाईन
IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सला कोविड-19 चा फटका बसला असून त्यांना मंगळवारी, 20 एप्रिल रोजी होणार्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या त्यांच्या सामन्यासाठी पुण्याला जाण्याची त्यांची योजना रद्द करावी लागली आहे. डीसीच्या फिजिओनंतर आता एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे संपूर्ण संघाला मुंबईत विलगीकरणात ठेवण्यास भाग पाडले आहे. आयपीएल, एसओपीनुसार आरटी-पीसीआर […]
मुंबईत कोरोनाच्या दोन नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले, आरोग्य विभाग सतर्क
मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती. त्यानंतर जवळपास सर्व प्रकारचे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. पण आता कोरोनाचे दोन नवीन प्रकार मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत कप्पा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आलाआहे, तर कोरोनाच्या “XE” प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाचीही ओळख पटली आहे. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नमुने […]
ब्रेकिंग! लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयसीयूमध्ये उपचार सुरु
मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची भाची रचनाने एएनआयला याबाबत सांगितले. त्यांना सौम्य लक्षणे दिसत असून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर या सध्या ९२ वर्षांच्या आहेत, त्यांचे वय लक्षात घेता लता मंगेशकर […]
ब्रेकिंग! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे आणि चाचणी करून […]
जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
मुंबई : जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. जॉनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हे अपडेट शेअर केले, जिथे त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले की कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तो त्याच्या पत्नीसह होम क्वारंटाइन झाला आहे. जॉन अब्राहमने इंस्टाग्रामवर चाहत्यांना आणि मित्रांना सांगितले की तो तीन दिवसांपूर्वी एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या […]
WHO कडून कोवॅक्सीन लसीला मिळाली मान्यता, मान्यता मिळालेली जगातील सातवी लस
कोवॅक्सीन ही पूर्णपणे स्वदेशी अँटी-कोरोनाव्हायरस लस आहे, आता या लसीला जागतिक मान्यता मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या लसीला आपत्कालीन वापराच्या यादीत (EUL) समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. WHO ची मान्यता मिळाल्यानंतर, कोवॅक्सीन लस घेणाऱ्या व्यक्तीला यापुढे इतर देशांमध्ये क्वारंटाईन करावे लागणार नाही. डब्ल्यूएचओने आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सीनला मान्यता दिल्याचे ट्विट करताना म्हटले आहे की, […]
चिंता वाढली! दिवसभरात 47 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, 509 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात भारतात कोरोना रुग्णांची 47 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्या तुलनेत बरे झालेल्या लोकांची संख्या कमी आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 509 आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी एकूण 47,092 कोरोना रुग्ण आढळले असून […]
वयोमानानुसार कोरोनाव्हायरसचा होतोय वेगवेगळा परिणाम, नव्या अभ्यासात झाला ‘हा’ खुलासा
न्यूयॉर्क : वयोमानानुसार कोरोनाव्हायरसची तीव्रता बदलते. एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की तरुण लोक, विशेषत: लहान मुलांमध्ये कोरोनाची कमी गंभीर लक्षणे आढळतात. वृद्धांना कोरोनाच्या गंभीर संसर्गाला सामोरे जावे लागते. मात्र, यामागील खरे कारण आणि फरक शोधण्यात शास्त्रज्ञांना समस्या येत आहेत. तथापि, कोणत्या एंजाइममुळे वृद्ध व्यक्तींना कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा सामना करावा लागतो, हे शोधण्यात […]