मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची भाची रचनाने एएनआयला याबाबत सांगितले. त्यांना सौम्य लक्षणे दिसत असून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
लता मंगेशकर या सध्या ९२ वर्षांच्या आहेत, त्यांचे वय लक्षात घेता लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे श्वास घेण्यास थोडा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.




