Schools of class 5th to 10th started in Navi Mumbai
महाराष्ट्र शैक्षणिक

राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार…

मुंबई : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत. शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे […]

plan to turn 471 government schools into model schools
महाराष्ट्र

राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू होणार, राज्य सरकार करणार 471 शासकीय शाळांचे परिवर्तन

मुंबई : राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार आहे. सध्या आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला […]

Yuzvendra Chahal Krishnappa Gowtham test positive for covid 19 in Shrilanka
क्रीडा

ब्रेकिंग : युजवेंद्र चहल आणि के गौतम यांना कोरोनाची लागण, संघाबरोबर भारतात परतता येणार नाही

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानंतर आता स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि के गौतम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मनीष पांडे, ईशान किशन आणि के गौतम यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या आठ भारतीय […]

pm modi meeting with union council of ministers cabinet
कोरोना राजकारण

लसीकरण केंद्रावरील रांगेत उभं राहून जाणून घ्या, लोकांना काय अडचणी येतायत – पंतप्रधान नरेंद्र मोदीं

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील शंका आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये आरोग्य मंत्रालय, नागरिक हवाई उड्डाण मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी कोरोना लसीकरणासंदर्भात सर्वच मंत्र्यांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसेच […]

China refuses to disclose early cases of corona infection to WHO
कोरोना ग्लोबल देश

लसीकरण झालेल्यांना देखील संक्रमित करतोय डेल्टा व्हॅरिएंट, WHO ने दिली ‘ही’ चेतावणी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्राणघातक डेल्टा व्हॅरिएंट आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी हा आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य प्रकार असल्याचे सांगितले आहे. चिंतेची बाब म्हणजे डेल्टा व्हॅरिएंट लसीकरण झालेल्यांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. त्यामुळे WHO च्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे. जिनेव्हा येथे झालेल्या या पत्रकार […]

government plans to quarantine those for 15 days who returning from another district says deputy cm ajit pawar
पुणे महाराष्ट्र

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, अजित पवार यांनी दिला इशारा

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की निर्बंध शिथील झाल्यानंतर फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर तसंच राज्याच्या बाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परत आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील, तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही […]

Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems
कोरोना देश

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याला समर्थन दिलंच नव्हतं, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १३ मे रोजी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित करण्यात आलं होतं. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता यासंदर्भात तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या […]

over 216 crore doses of vaccines will be manufactured in india between august december for indians
देश

भारतात कोरोना लसीमुळे पहिला मृत्यू, सरकारी समितीने दिला दुजोरा

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीमुळे 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सरकारने गठीत केलेल्या समितीने या वृत्तास दुजोरा दिला आहे. वृत्तानुसार, एका 68 वर्षीय व्यक्तीला 8 मार्च रोजी कोरोना लसीचा डोस देण्यात आला होता, त्यानंतर त्याला अ‍ॅनाफिलेक्सिससारखे दुष्परिणाम दिसून आले. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही एक प्रकारची ऍलर्जिक रिऍक्शन आहे. लस […]

Actress Aisha Sultana
देश राजकारण

अभिनेत्री आयशा सुलतानावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, मोदी सरकारविरुद्ध केलेले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले

लक्षद्वीप : अभिनेत्री आणि मॉडेल आयशा सुलताना हिच्यावर गुरुवारी लक्षद्वीप पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.  लक्षद्वीप बेटांच्या जनतेविरूद्ध मोदी सरकारने कोविड -१९ चा ‘जैव-शस्त्र’ म्हणून वापर केल्याचा वादग्रस्त दावा केल्याने आयशा सुलताना हिच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाच्या लक्षद्वीप युनिटचे अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कावरट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा […]

15 days special casual leave for govt employees whose parents or dependents test covid positive
देश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पालकांना कोरोनाची लागण झाल्यास मिळणार SCL

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट सध्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना नवीन सुविधा दिल्या आहेत. जर एखाद्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या पालकांना किंवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर तो कर्मचारी 15 दिवसांसाठी खास कॅज्युअल रजा (SCL) घेण्यास पात्र ठरेल, असा आदेश मंत्रालयाने जारी केला आहे. मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांना भेडसावणाऱ्या […]