China refuses to disclose early cases of corona infection to WHO
कोरोना ग्लोबल देश

लसीकरण झालेल्यांना देखील संक्रमित करतोय डेल्टा व्हॅरिएंट, WHO ने दिली ‘ही’ चेतावणी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्राणघातक डेल्टा व्हॅरिएंट आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी हा आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य प्रकार असल्याचे सांगितले आहे. चिंतेची बाब म्हणजे डेल्टा व्हॅरिएंट लसीकरण झालेल्यांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. त्यामुळे WHO च्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जिनेव्हा येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत टेड्रोस अधानोम म्हणाले की, ‘डेल्टा हा एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार आहे ज्याने सुमारे 85 देशांना वेढले आहे. एवढेच नाही तर हा व्हॅरिएंट लस घेतलेल्या लोकांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. डब्ल्यूएचओने इशारा दिला आहे की जेव्हा आपण कोरोनाचे निर्बंध शिथिल करतो, आणि सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक अंतर पाळणे या गोष्टीकडे लक्ष देणं कमी करतो, तेव्हा जगभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागतात. ते पुढे म्हणाले की संसर्गाची गती वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रकार वाढू लागतात. आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडतो. या कारणांमुळे देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढते.

नवीन कोरोना व्हॅरिएंट तयार होण्याची शक्यता जास्त आहे आणि ते सतत नोंदवले जात आहेत. व्हायरसच्या बाबतीत हे होत असतं. ते स्वतःच विकसित होत राहतात. परंतु आपण यावर ब्रेक लावून व्हेरिएंट विकसित करण्याची प्रक्रिया थांबवू शकतो.

डेल्टा हा कोरोनाचा एक अतिशय धोकादायक प्रकार आहे आणि अल्फा प्रकारापेक्षा हा जास्त संसर्गजन्य आहे, जो युरोपसह जगातील बर्‍याच देशांमध्ये पसरला होता. त्याची प्रकरणे जगभरात झपाट्याने समोर येत आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा व्हॅरिएंटमुळे संक्रमित झालेल्या कोरोना रूग्णांमध्ये ऐकायला येणे कमी होणे, ओटीपोटाचा त्रास, रक्ताच्या गुठळ्या होणे, गॅंग्रिन या सारखी लक्षणे दिसून येत आहेत. आत्तापर्यंत ही लक्षणे कोरोना रूग्णांमध्ये सामान्यत: दिसली नव्हती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत