Vidhansabha Nagpur
नागपूर महाराष्ट्र

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

नागपूर : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज […]

China refuses to disclose early cases of corona infection to WHO
कोरोना ग्लोबल देश

लसीकरण झालेल्यांना देखील संक्रमित करतोय डेल्टा व्हॅरिएंट, WHO ने दिली ‘ही’ चेतावणी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्राणघातक डेल्टा व्हॅरिएंट आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी हा आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य प्रकार असल्याचे सांगितले आहे. चिंतेची बाब म्हणजे डेल्टा व्हॅरिएंट लसीकरण झालेल्यांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. त्यामुळे WHO च्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे. जिनेव्हा येथे झालेल्या या पत्रकार […]

legendary runner Milkha Singh infected with corona
क्रीडा देश

महान युगाचा अंत! भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

चंडीगड : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय ॲथलिट आणि फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. कोरोना झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना मोहालीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप […]

chinese scientists created corona virus
कोरोना देश

गौप्यस्फोट : कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही, कोरोना ही चीनचीच निर्मिती…

लंडन : सार्स सीओव्ही २ म्हणजे कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही. कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढण्याची मागणी जगभरात लावून धरण्यात येत असतानाच हा विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केल्याचा दावा एका अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेतील चीनचे वैज्ञानिक यात सामील होते, नंतर त्यांनी तो वटवाघळातूनच आला असे दाखवण्यासाठी त्याचे रूप […]

dialogue writer subodh chopra passed away due to post covid complications
मनोरंजन

प्रसिद्ध संवाद लेखक सुबोध चोप्रा यांचे कोरोनामुळे अकाली निधन, चित्रपटसृष्टीवर पसरली शोककळा

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी आपला जीव गमावला. दरम्यान, आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘मर्डर’, ‘रोग’ सारख्या बर्‍याच चित्रपटांसाठी संवाद लेखन करणारे लेखक सुबोध चोप्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ४९ वर्षांचे होते. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सुबोध चोप्रा यांचे निधन झाले. सुबोध यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची […]

after recovery from corona do these tests, otherwise there may be problems in future
कोरोना तब्येत पाणी

कोरोनातून बरे झाल्यानंतर करा ‘या’ चाचण्या, अन्यथा उद्भवू शकतात समस्या, जाणून घ्या का आहेत महत्वाच्या…

देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात विनाश करीत आहे. दररोज लाखो कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान, मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्णही बरे होत आहेत. आरोग्य तज्ञांनी अलीकडेच कोरोनातून बऱ्या झालेल्या सर्वांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. डॉक्टरांनी कोरोनातून बरे झालेल्या सर्व रूग्णांना लसीकरण व पोस्ट रिकव्हरी चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी […]

Popular anchor Kanupriya dies due to corona
कोरोना देश

लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन

अभिनेत्री आणि अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. ब्रह्माकुमारी शिवानी यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. कनुप्रिया खूप लोकप्रिय अँकर होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कनुप्रियाने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि सांगितलं होतं की मी रुग्णालयात दाखल आहे आणि माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. अहवालानुसार, ऑक्सिजनची पातळी […]

Get rid of worries about hospital expenses during Corona, health insurance is important
अर्थकारण

रुग्णालयाच्या खर्चाच्या चिंतेतून मुक्त व्हा.. आर्थिक संकटातून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवा..

आपल्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आरोग्य विमा योजना कवच न घेणाऱ्या अनेकांना कोरोना महामारीने जागं केलं आहे. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत? यावरुन आधारित रुग्णालयाचा खर्च लाखांच्या घरात जाऊ शकतो. ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना होती त्यांच्यासाठी त्यांची विमा कंपनी रुग्णालयाचं बिल भरत होती. पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विमा योजना नव्हती त्यांना मात्र आपल्याच खिशातून […]

e pass maharashtra for private vehicles
कोरोना महाराष्ट्र मुंबई

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक; कसा काढायचा? जाणून घ्या

मुंबई : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा लागेल. यासाठी अर्ज करून प्रवास करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ई-पासची गरज नाही. अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना प्रवास करायचा असल्यास त्यासाठी […]

AIIM doctors and nursing staff infected
कोरोना देश

कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह

पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण […]