अभिनेत्री आणि अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. ब्रह्माकुमारी शिवानी यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. कनुप्रिया खूप लोकप्रिय अँकर होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
कनुप्रियाने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि सांगितलं होतं की मी रुग्णालयात दाखल आहे आणि माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. अहवालानुसार, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे आणि ताप वाढल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
Om Shanti Angels. Last night a very beautiful angel, a chosen instrument of God, Sis. Kanupriya left her mortal coil and moved forward to another magical destiny of radiating happiness and health to millions of souls.
Let us meditate and radiate gratitude and blessings to her. pic.twitter.com/LAWTjPTsSb— BK Shivani (@bkshivani) May 1, 2021
कनुप्रियाने तिच्या कारकीर्दीची सुरुवात दूरदर्शनवर अँकर म्हणून केली. यानंतर त्यांनी अभिनय, पटकथा लेखन आणि नाट्यक्षेत्रातही काम केले. त्यानंतर ‘अवेकनिंग विथ ब्रह्मा कुमारी’ (awakening with brahma kumaris) या शो मध्ये अँकर म्हणून काम केले.




