Khel Ratna Award Renamed As Major Dhyan Chand Khel Ratna Award
क्रीडा देश

ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक क्षणांचा अनुभव घेत असताना लोकांनी केलेल्या आग्रहानुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले जाणार आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे कि, “मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते, ज्यांनी भारताचा सन्मान आणि अभिमान वाढवला. आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्यांच्या नावावरून ओळखला जाईल हे योग्य आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत