6 year old boy died took out from the bore well in hoshiarpur
देश

दुःखद! चिमुकला कुत्र्यांपासून वाचण्यासाठी बोअरवेलच्या पाईपवर चढला आणि अनर्थ घडला…

पंजाब : पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील गड्डीवाला भागातील बैरामपूर गावात 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मुलाला बाहेर काढता आले. मुलाला बाहेर काढताच त्याला थेट रुग्णालयात नेले. परंतु, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9 ते 10 च्या सुमारास हा चिमुकला शेतात खेळत होता, यावेळी अचानक काही भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी कुत्र्यांपासून वाचण्यासाठी हा ६ वर्षांचा मुलगा धावत जाऊन शेतात बनवलेल्या बोअरवेलच्या अडीच फूट उंचीच्या ज्यूटच्या पिशवीने झाकलेल्या पाईपवर चढला आणि तो बोअरवेलमध्ये पडला. या मुलाचे नाव हृतिक असल्याचे सांगण्यात आले. आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, बोअरवेलच्या पाईपवर लोखंडी झाकण लावलेले होते, ते कोणीतरी नेले असावे.

मुलाचे प्राण वाचवण्यासाठी एन.डी.आर.एफ पथकाला पाचारण करण्यात आले आणि लष्कराचीही मदत घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलापर्यंत पोहोचण्यासाठी बोअरवेलला समांतर एक बोगदा खोदला जात होता आणि त्याला ऑक्सिजन पुरवला जात होता. त्यानंतर मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. आपत्कालीन सेवेसाठी वैद्यकीय पथकेही उपस्थित होती. मात्र, मूल वाचले नाही.

घटनेची माहिती मिळताच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या घटनेबाबत ट्विट केले. ते म्हणाले की, होशियारपूरमध्ये ६ वर्षांचे बालक बोअरवेलमध्ये पडले आहे. घटनास्थळी प्रशासन आणि स्थानिक आमदार उपस्थित आहेत. बचावकार्य सुरूच आहे. प्रशासनाकडून सातत्याने अपडेट्स घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत