30-year-old woman had relation with 15-year-old boy
देश

30 वर्षीय महिलेचे 15 वर्षीय मुलाशी जुळले संबंध, दोघे घरातून पळून गेले आणि…

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 30 वर्षीय महिलेने तिच्या अर्ध्या वयाच्या मुलाचे अपहरण करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही महिला मुलासोबत राहण्याच्या आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने पळून गेली होती. मात्र, पोलिसांनी आता या मुलाला आणि महिलेला हैदराबादच्या बालानगर भागातील भाड्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी आठवीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय मुलाने त्याच्या पालकांना सांगितले की तो त्याच्या मित्रांना भेटायला जात आहे. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे मुलाच्या आई-वडिलांना काळजी वाटायला सुरुवात झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की एक महिला जी आपल्या पती आणि दोन मुलांसोबत त्यांच्या घरापासून जवळच राहते, तीदेखील बेपत्ता आहे. त्यानंतर या महिलेनेच मुलाचे अपहरण केल्याचा संशय मुलाच्या कुटुंबीयांना आला आणि त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले.

या सर्व प्रकारानंतर महिलेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या सर्व प्रकारादरम्यान, मंगळवारी पोलिसांना माहिती मिळाली की, ही महिला अल्पवयीन मुलासोबत हैदराबादमधील एका घरात भाड्याच्या खोलीत राहत होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही सुखरूप शोधून काढले. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तपासादरम्यान असे आढळून आले की, या महिलेला त्या मुलाबाबत आकर्षण वाटत होते आणि तिने या मुलाचे अपहरण करण्यापूर्वीच तिच्या घरी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत