उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात आज यमुना नदीत मोठी दुर्घटना घडली. ३० हून अधिक लोक बोटीतून प्रवास करत होते, ती बोट नदीत बुडाली. सध्या या दुर्घटनेत 20 जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. ही बोट फतेहपूरला जात होती, लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक बांदा व इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात गोताखोर, बोटी आदींच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
Boat capsizes in Yamuna river in #Banda district. At least people missing, 2 dead bodies recovered. pic.twitter.com/vri6ZtZo9K
— Nikhil Choudhary (@NikhilCh_) August 11, 2022
मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याच्या सूचना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांदा येथील यमुना नदीत बोट दुर्घटनेप्रकरणी जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांना संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा दंडाधिकारी, डीआयजी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाला तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले.




