Guwahati-Bikaner Express derailed
देश

ब्रेकिंग! बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस रुळावरून घसरली

कोलकाता : बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस डोमोहनीजवळ रुळावरून घसरली.  बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेस बंगालच्या उत्तर भागात मैनागुरीजवळ डोमोहनीजवळ रुळावरून घसरली आहे. ही ट्रेन पटनाहून गुवाहाटीला जात होती. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती असून सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मेनागुरीजवळ सायंकाळी ५.०५ वाजता हा अपघात झाला. या अपघातात चार डबे रुळावरून घसरल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत असून मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हे क्षेत्र उत्तर पूर्व हद्दीत येते. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. स्थानिक लोक जखमींना रेल्वेच्या बोगीतून बाहेर काढत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत