Wing Commander Captain Abhinandan Varthaman awarded Vir Chakra
देश

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान वीर चक्राने सन्मानित

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना त्यांच्या शौर्याबद्दल वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा गौरव केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनंदन यांना हा सन्मान दिला जात आहे कारण त्यांनी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान त्यांच्या मिग-21 बायसन लढाऊ विमानाने पाडले होते. मात्र यादरम्यान त्यांच्या जेटचेही नुकसान झाले. तेव्हा अभिनंदन पाकिस्तानच्या जमिनीवर पडले आणि त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले होते.

सुमारे 60 तासांनंतर पाकिस्तानने त्यांना पुन्हा भारताच्या ताब्यात दिले. या 60 तासात पाकिस्तान भीतीच्या छायेत जगत होता. अभिनंदन यांच्यासाठी भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती त्यांना वाटत होती. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी खुलासा केला होता की, भारताचे फायटर पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने भारताच्या भीतीमुळे सोडले होते. ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानच्या संसदेत हे वक्तव्य केले होते. अभिनंदन यांना सोडून देऊन पाकिस्तानला भारत आणि जगाला खूश करायचे होते, असे ते म्हणाले होते.

दुसरीकडे, पाकिस्तान विधानसभेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक म्हणाले होते की, अभिनंदन यांना पकडल्यानंतर पाकिस्तानला सतत भीती वाटत होती की भारत त्यांच्यावर हल्ला करेल. या हल्ल्याच्या भीतीने लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथरत होते. चेहऱ्यावर घाम आला होता. बाजवा यांना भारताकडून हल्ल्याची भीती वाटत होती. एवढेच नाही तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशीही हादरले होते. ते म्हणत होते की, अभिनंदनला सोडून द्या. रात्री ९ वाजेपर्यंत अभिनंदनला सोडले नाही तर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत