high court questions parambir singh

परमबीर सिंह भारतातच, जीवाला धोका असल्याने ते समोर येत नाहीत, वकिलांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

महाराष्ट्र मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंह भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने यावेळी दिली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज झालेल्या सुनावणीत परमबीर सिंह यांच्या वकिलाने सांगितले की, परमबीर सिंह भारतात असून ते नेपाळला गेल्याची चर्चा चुकीची आहे. परमबीर सिंग यांनीही आपण सीबीआयसमोर हजर राहण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर न्यायालयाने दिलासा देत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली.

सुनावणीदरम्यान परमबीर सिंह यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले कि, “सिंह यांच्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून तसे न केल्यास अनेक गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. परमबीर सिंग कुठेही फरार होऊ इच्छित नाहीत. महाराष्ट्रात येताच पोलिसांकडून त्यांच्या जीवाचा धोका असल्याने ते समोर येत नाहीत.”

या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मुंबईत येऊन राहण्यास घाबरतात हे आश्चर्यकारक आहे. न्यायमूर्ती एस.के. कौल म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मुंबई पोलिसांपासून आपल्याला धोका असल्याचे सांगत असतील तर त्यातून कोणता संदेश जातो? सिंग यांच्या वकिलांनी सांगितले की, त्यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर पैसे उकळण्याचे रॅकेट चालवल्याचा आरोप केला असल्याने त्यांना गोवण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत