अहमदनगर : लग्नाला अवघे काही महिने झालेल्या नवदाम्पत्याचे मृतदेह आढळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या जोडप्याचे मृतदेह दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर येथे ही दुर्दैवी घटना […]
अहमदनगर
कौतुकास्पद! ताईबाईच्या मातृत्वाला जाग, नेसलेली साडी सोडून वाचवले दोघांचे प्राण
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा ताईबाई नावाच्या एका महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे. जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताईबाईंचं सर्वत्र कौतुक होत आहे. दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधात पावसामुळे धरण ८०% टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी […]
जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं विधान; म्हणाले, फक्त चार महिने, नोव्हेंबरनंतर…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा २५ वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील वर्धापन दिनाच्या […]
दुःखद घटना – प्रवरा नदीत बुडालेल्या मुलांचा शोध सुरू असताना एसडीआरएफचे जवान बुडाले, तीन जवानांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु…
संगमनेर – बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय – २५ रा. धुळवड […]
शिर्डी – आळंदी पालखीला अपघात, कंटेनर भरधाव वेगात पालखीत घुसल्याने चार जणांचा मृत्यू तर नऊ वारकरी जखमी
शिर्डी : शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल जवळ अपघात झाला. पालखी आळंदीकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेला कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा भयंकर अपघात झाला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल (खंदरमाळवाडी) परिसरात रविवारी सायंकाळी […]
अखेर तिढा सुटला! औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानंतर प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद कायम
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरवले होते. याबाबत प्रमोद बोंद्रे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला असून, प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिबलापुर ग्रामपंचायतीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्ता होती. ठरल्याप्रमाणे अडीच […]
पुणे : ओतूर परिसरात भीषण अपघात, दोन महिलांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
पुणे : जुन्नर तालुका हद्दीत नगर – कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ओतूर परिसरातील कोळमाथा या ठिकाणी पिकअपने एकाच वेळी एका पायी जाणाऱ्या युवतीला आणि दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला धडक दिली. या अपघातात दोनही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
शिर्डी, चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार; शासकीय काम अधिक गतिमान होणार
मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून शासकीय काम अधिक गतिमान होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. शिर्डी आणि चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील […]
राज्यात प्रथमच झाले सिंगल वुमनचे सर्वेक्षण; आकडेवारीतून समोर आले धक्कादायक वास्तव
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांना विविध कल्याणकारी योजना देण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडी मार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात १ लाख ७२६ महिला आढळल्या आहेत. जिल्ह्यातील एकल महिलांचा इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. ग्रामीण भागात विधवा घटस्फोटीत परित्यक्ता महिलांची इतकी मोठी संख्या यानिमित्ताने प्रथमच एकत्रित […]
शिर्डी-अहमदनगरच्या विकासात समृद्धी आणणारा महामार्ग!
अहमदनगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी १० किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गालगत जिल्ह्यात २ कृषी […]