Election Commission Of India
महाराष्ट्र राजकारण

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पाचव्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे : धुळे लोकसभा मतदारसंघात 18, दिंडोरी – 10 , नाशिक – 31, पालघर – 10, भिवंडी – 27, कल्याण – 28, ठाणे – 24, मुंबई उत्तर – 19, मुंबई उत्तर पश्चिम – 21, मुंबई उत्तर पूर्व – 20, मुंबई उत्तर मध्य – 27, मुंबई दक्षिण मध्य – 15 आणि मुंबई दक्षिण – 14 अशी आहे. या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत