In eight constituencies in the second phase of the Lok Sabha elections
महाराष्ट्र सोलापूर

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे. या अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच अनुषंगाने करमाळा तालुक्यातील गोयेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने आदर्श मतदान केंद्र केलेले आहे. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना फूट मसाजरची सुविधा गोयेगाव ग्रामपंचायतने दिलेली आहे, अशी माहिती करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गोयेगाव ग्रामपंचायत ने आदर्श मतदान केंद्राच्या बाहेर हे फूट मसाजर मतदारासाठी ठेवलेले आहे. त्यामुळे येथे मतदान करण्यासाठी पायी चालून येणाऱ्या मतदारांना तसेच उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन डीहायड्रेशन झाल्यानंतर मतदारांना पायांचा त्रास झाल्यास तात्काळ पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर हे अद्यावत यंत्र येथे ठेवण्यात आलेले आहे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून ही सुविधा मतदारासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. मतदारांसाठी केलेला हा एक अनोखा उपक्रम असल्याने या भागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केल्यानंतर खूप मसाजर मशिन च्या माध्यमातून पाय दाबून घेण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, एएमएफ चे नोडल अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती करमाळा व ग्राम पंचायत गोयेगाव यांनी मतदारांसाठी फूट मसाजर हा अनोखा उपक्रम केलेला आहे.

वस्तीवरून गावातून चालत येणाऱ्या मतदारांना डीहायड्रेशन चा होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामार्फत ORS आणि मेडिकल किट ठेवण्यात आले आहे. तसेच या मतदान केंद्रावर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेला आहे. मतदारांना उन्हापासून संरक्षण म्हणून मंडप टाकण्यात आला आहे. शाळेतील अमृत रसोई मध्ये फ्रीज उपलब्ध आहे तेथे थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले आहे. मतदारांना मतदानाच्या शिक्षणासाठी व्हरांड्यात टीव्ही लावण्यात आलेला आहे. या मतदान केंद्रावर 100% मतदान होण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत