औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास […]