The body of a person
देश

चालत्या ट्रेनसमोर व्हिडिओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

होशंगाबाद : इन्स्टाग्रामसाठी चालत्या ट्रेनसमोर स्टंट व्हिडिओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचा मित्र त्याचा व्हिडीओ बनवत होता. रविवारी संध्याकाळी हा तरुण त्याच्या मित्रासोबत रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ बनवण्यासाठी गेला होता. हा तरुण फिल्मी स्टाईलमध्ये मागून येणाऱ्या ट्रेनसमोरून चालला होता, यावेळी अचानक ट्रेनची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मित्राकडील मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओवरून हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संजू कृष्णकुमार चौरे, पांजरा काला गावातील रहिवासी होता. तो त्याच्या अल्पवयीन मित्रासह नागपूर रेल्वे मार्गावरील पुलाजवळ गेला होता. तिथे संजूने त्याच्या मित्राला चालत्या ट्रेनसमोर व्हिडीओ बनवण्यास सांगितले आणि त्याला मोबाईल दिला. त्याने सांगितले की रेल्वेचे इंजिन येईपर्यंत व्हिडीओ बनव, त्यानंतर मी येथून बाजूला जाईन.

ट्रेन अगदी जवळ आल्यानंतर संजूला बाजूला जाता आले नाही, रुळावर असलेल्या तरुणाला पाहून ट्रेन चालकाने हॉर्नही दिला, पण काही कळण्याच्या आतच तो इंजिनला धडकला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्याच्या मित्राने याबाबत पोलिसांना माहिती दिली. या तरुणाला शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोमवारी दुपारी शवविच्छेदनानंतर युवकाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपासात समोर आले की, संजूला त्याच्या अकाउंटवर असे व्हिडिओ अपलोड करण्याची सवय होती, त्याचा हा छंद त्याच्यासाठी जीवघेणा ठरला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत