Indian Student Stabbed In Head At US Gym, Dies
ग्लोबल देश

भयंकर! अमेरिकेतील जिममध्ये भारतीय विद्यार्थ्याच्या डोक्यात चाकूने वार, विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिका : अमेरिकेतील इंडियाना राज्यातील फिटनेस सेंटरमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याच्या डोक्यात वार केल्याची भयंकर घटना घडली. या घटनेत वरुण नावाच्या विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले. इंडियानामधील या दुःखद घटनेत, 29 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक जिममध्ये हल्लेखोर जॉर्डन अँड्राडे (24) याने वरुणच्या डोक्यात चाकूने वार केले होते. यात वालपरिसो विद्यापीठात संगणक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या वरुण राज पुचा […]

Musa Yamak Undefeated German Boxer Dies Of Heart Attack During Fight Aged 38
क्रीडा

जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचे निधन, फाईट सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका आणि…

म्युनिच : जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचा शनिवारी म्युनिचमध्ये युगांडाच्या हमजा वांडेराशी सामना करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ३८ वर्षांचे होते. बॉक्सिंग जगताने आणखी एक स्टार गमावल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या बातमीची पुष्टी करण्यासाठी तुर्कीच्या एका अधिकाऱ्याने ट्विटरवर माहिती दिली. “आम्ही आमचा देशबांधव मुसा अस्कान यामाक, अलुक्राचा बॉक्सर, ज्याने युरोपियन आणि आशियाई चॅम्पियनशिप […]

Singer-composer Bappi Lahiri dies in Mumbai hospital
मनोरंजन

ब्रेकिंग! ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

मुंबई : गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. ते ६9 वर्षांचे होते. त्यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना पूर्ण बेड रेस्ट देण्यात आली होती. त्यामुळे हालचाल करण्यासाठी आणि सोयीसाठी त्यांच्या जुहू येथील […]

17 years old international shooter khush seerat kaur sandhu dies by suicide at shot herself
देश

भारताची नेमबाज खुश सीरत कौर संधूची आत्महत्या, स्वतःवर झाडली गोळी

नवी दिल्ली : भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज खुश सीरत कौर संधू हिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, ती अवघ्या १७ वर्षांची होती. तिने पंजाबमधील फरीदकोट येथील तिच्या घरी आत्महत्या केली. खुश सीरत कौर संधूने ९ डिसेंबरला सकाळी स्वत:वर गोळी झाडून घेतली. राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकणाऱ्या संधूने अलीकडच्या कामगिरीमुळे दु:खी झाल्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या […]

Kannada superstar Puneet Rajkumar dies of heart attack
मनोरंजन

अभिनेते पुनीत राजकुमार यांचे निधन, रुग्णालयाच्या बाहेर चाहत्यांचा आक्रोश

सुप्रसिद्ध कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुनीत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 11.30 वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले […]

senior literary d m mirasdar dies in pune
पुणे महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. […]

Veteran Actress Surekha Sikri Dies Of Cardiac Arrest At 75
मनोरंजन

ब्रेकिंग : ‘बालिका वधू’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे मॅनेजर विवेक सिधवानी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. शुक्रवारी सकाळी सुरेखा सिक्री यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. माध्यमांशी शेअर केलेल्या एका निवेदनात त्यांच्या मॅनेजरने सांगितले की, “अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज सकाळी वयाच्या 75 व्या […]

1983 World Cup Winner Member Yashpal Sharma Dies Of Heart Attack
क्रीडा

ब्रेकिंग : माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन, १९८३ विश्वचषक जिंकण्यात मोलाचा वाटा

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल शर्मा १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. यशपाल शर्मा हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक महत्त्वाचा भाग होते. त्यांनी विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात 89 धावांचा शानदार डाव […]

taiwan 7 year old boy thrown 27 times in judo class dies
क्राईम ग्लोबल

ज्युडो प्रशिक्षकाने रागात चिमुकल्याला 27 वेळा जमिनीवर आपटलं, 2 महिने कोमात राहिल्यानंतर मृत्यू

तैवान : ज्युडो प्रशिक्षकाने रागाच्या भरात 7 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा प्रशिक्षकाला मूर्ख म्हणाला होता, त्यामुळे या प्रशिक्षकाला राग अनावर झाला. त्यानंतर या प्रशिक्षकाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या चिमुकल्याबरोबर लढायला सांगितले. या दरम्यान, प्रशिक्षकाने या चिमुकल्या मुलाला 27 वेळा जमिनीवर आपटण्यास देखील सांगितले. यामुळे चिमुकल्याला उलट्या झाल्या आणि नंतर […]

filmmaker Ryan Stephen dies due to corona
मनोरंजन

बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का, चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय फक्त 50 वर्षे होते. रायन यांना कोरोनाची संसर्ग झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर इंडस्ट्रीमधील त्याच्या खास मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. रायन स्टीफन यांच्या मृत्यूची बातमी […]