pm modi meeting with union council of ministers cabinet

लसीकरण केंद्रावरील रांगेत उभं राहून जाणून घ्या, लोकांना काय अडचणी येतायत – पंतप्रधान नरेंद्र मोदीं

कोरोना राजकारण

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील शंका आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये आरोग्य मंत्रालय, नागरिक हवाई उड्डाण मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी कोरोना लसीकरणासंदर्भात सर्वच मंत्र्यांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसेच कोरोनाच्या कालावधीमध्ये हाती घेतलेले प्रकल्प रखडणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी आपल्या सहकऱ्यांना केल्यात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना कोरोनासंदर्भातील नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे सांगितले. तसेच मंत्र्यांनी स्वत: मास्क लावण्याबरोबरच लोकांनाही मास्क लावण्याचं महत्व पटवून द्यावं. कोरोना संपलाय असं कोणीही समजू नये. तिसरी लाट येणारच नाही अशापद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे, असंही मोदी यावेळी मंत्र्यांशी बोलताना म्हणाले.

पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावं यासाठी सर्व नेत्यांनी आजपासूनच कामाला सुरुवात करण्याची गरज असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं. पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांना थेट लसीकरण केंद्रावरील रांगांमध्ये उभं राहून परिस्थितीची चाचपणी करण्याचाही सल्ला दिला. लसीकरण केंद्रावरील रांगांमध्ये उभं राहून जाणून घ्या की लोकांना नक्की काय अडचणींचा समाना करावा लागतोय, असं मोदी म्हणाल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. सरकारच्या योजनांचा अगदी तळागाळातील व्यक्तींना फायदा व्हावा यासाठी काम करा, असं आवाहनही मोदींनी केलं.

पंतप्रधानांनी कोरोनामुळे वेगवेगळ्या मतदारासंघांमध्ये सुरु झालेल्या प्रकल्पांची कामं थांबता कामा नये अशी सूचनाही मंत्र्यांना केली. ज्या ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन किंवा बांधकामाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावली त्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळाही तुमच्याच हस्ते पार पडला पाहिजे अशा वेगाने काम करा, असा सल्ला मोदींनी दिली. सर्व प्रकल्पांच्या कामांवर लक्ष ठेवा आणि हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी उशीर होत नाहीय ना याची काळजी घ्या.

७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काय करता येईल यासंदर्भातील सल्लाही मोदींनी आपल्या सहकाऱ्यांकडे मागीतला. बुधवारी रात्री उशीरापर्यंत ही आढावा बैठक सुरु होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत