कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, कोविड प्रकरणांनी 4 महिन्यांनंतर ओलांडला 17,000 चा टप्पा

कोरोना देश

नवी दिल्ली : देशात एका दिवसात 17,336 नवीन कोविड-19 प्रकरणांची वाढ झाली आहे, तर 13 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोना संसर्गाची संख्या 4,33,62,294 वर आणि मृतांची संख्या 5,24,954 वर पोहोचली. भारतातील एका दिवसातील कोविड प्रकरणांनी 120 दिवसांत प्रथमच 17,000 चा टप्पा ओलांडला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोना महामारीमुळे जगातील अनेक देशांमध्ये अजूनही चिंतेचं वातावरण आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 चे 17,336 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 88,284 झाली आहे. याआधी गुरुवारी, गेल्या २४ तासांत देशात कोविड-19 चे १३,३१३ नवीन रुग्ण आढळले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरणाबाबत बोलायचे झाल्यास, गुरुवारी 13 लाखांहून अधिक डोस देण्यात आले, त्यापैकी 3.77 लाख बूस्टर डोस होते. पहिल्या आणि दुसऱ्या डोससह – 12 ते 14 वर्षे वयोगटातील 3.23 लाखांहून अधिक मुलांचे देखील गेल्या 24 तासांत लसीकरण करण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत