MLA Gopichand Padalkar's car pelted with stones

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

महाराष्ट्र सोलापूर

सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. ते बैठकीसाठी सोलापुरात आले होते. सकाळीच त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी आमदार पडळकर हे शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या गाडीतून घोंगडी बैठकीला आले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीची काच फोडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठे पोलीस चौकीचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. आता पोलीस कोणी मुद्दाम दगडफेक केली की अन्य कारणामुळे गाडीची काच फुटली याचा तपास करत आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. ते म्हणाले होते की शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत