Rise in the price of domestic gas cylinders once again
देश

महागाईचा भडका! गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ

मुंबई : महागाईमुळे सामान्य माणसांच्या खर्चाचे बजेट कोलमडत आहे. त्यातच पुन्हा एकदा विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये होती. दरम्यान, एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती 10 रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या, त्यानंतर मे-जूनमध्ये एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडर 861 रुपयांना विकण्यात येणार आहे. तर मुंबईत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 834 रुपये असणार आहे. चेन्नईत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 850 रुपयांवर पोहोचल्या आहेत.

तसेच दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 76.50 रुपयांनी वाढून 1550 रुपये झाली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, एक जून रोजी दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत 122 रुपयांनी कमी करण्यात आली होती. सध्या कोलकाता, मुंबई, चेन्नईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत अनुक्रमे 1651.50, 1507, 1687.50 रुपये आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत