भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात!

महाराष्ट्र रत्नागिरी राजकारण

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैय्या सामंत यांची उमेदवारी मागे घेतली. त्याचवेळी भाजपकडून राणेंना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपने उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्यापाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एका राज्यसभा खासदाराला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस तोंडावर असतानाही हा तिढा सुटलेला नव्हता. भाजपकडून नारायण राणे यांचं एकमेव नाव चर्चेत होतं. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी मतदारसंघावर अखेर भाजपने झेंडा रोवत राणेंना मैदानात उतरवलं आहे.

Maharashtra: BJP announces Union Minister Narayan Rane as its candidate from Ratnagiri Sindhudurg Lok Sabha seat.

रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात २०१९ मध्ये विनायक राऊत आणि डॉ.नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली होती. राऊत यांनी शिवसेना -भाजप युतीकडून लढविली होती तर राणे यांनी स्वाभिमान पक्षातून उभे होते. या लढतीत राऊत यांनी बाजी मारली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत