gas leakage in badlapur people suffer from breathing problem

बदलापूर एमआयडीसीत गॅस गळती, परिसरातील लोकांना उलट्या, डोळ्यांची जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास

ठाणे महाराष्ट्र

ठाणे : बदलापूर एमआयडीसीत गुरुवारी (3 जून) रात्री अकराच्या सुमारास रासायनिक कंपनीत गॅस गळती झाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी या परिसरात ३ किमीपर्यंत लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमीडिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कंपनीतील रिऍक्टरमध्ये काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही गॅस गळती झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, रासायनिक कंपनीतील रिअॅक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केलं जात होतं. मात्र त्यासाठी लागणारे तापमान नियंत्रित करताना चूक झाल्याने या रिॲक्टरमधून गॅस लीक झाला आणि परिसरात पसरला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही गॅस गळती रोखली. तसंच रिअॅक्टरचं कुलिंग ऑपरेशन केलं. हा वायू ज्वलनशील नाही, परंतु या गॅसमुळे परिसरातील लोकांना श्वास घ्यायला त्रास, उलट्या, मळमळ, डोळ्यांची जळजळ, खोकला असे त्रास होऊ लागले. गॅस गळती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत