massive explosion at m r pharma chemical company lote midc khed
महाराष्ट्र रत्नागिरी

लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे एमआयडीसीत पुन्हा एका कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरल्याचे माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. स्फोट झाल्यानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाच्या भीषण आवाजाने कंपनीच्या आजूबाजूचा परिसर हादरला असून अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहे. या भागात कितीतरी दूर अंतरावरून धुराचे लोट दिसून येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळावर मदतकार्य आणि आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत