crime
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहकारनगर भागातील तळजाई परिसरात चारित्र्याच्या संशयावरून आणि कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी सत्यवान अनिल मोहिते (वय 26, रा. शेळगाव, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहितेच्या पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ करत होता. 24 ऑगस्टला देखील त्याने भांडण उकरून काढत पत्नीला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबला, यामुळे त्याची पत्नी बेशुद्ध पडली. त्यानंतर मोहिते घराला बाहेरून कडी लावून पसार झाला.

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचा काही महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. मात्र, त्यांच्यात वारंवार वादविवाद होत असायचे. दोन दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीला कंटाळून बाहेर जात असताना पतीने तिला अडवले आणि तिला खाली पाडून ठार मारण्याच्या उद्देशाने दोन्ही हाताने तिचा गळा दाबला. त्यात पत्नी बेशुद्ध झाली. त्यानंतर पतीने घराला बाहेरून कडी लावून पळ काढला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत