Relief to Ajit Pawar clean chit from election officials

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

राजकारण

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित ‘मतासाठी निधी’ या वक्तव्यावरुन त्यांना क्लीन चिट दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग झाला नसल्याचे नमूद केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा व्हिडिओ वारंवार पाहिला आहे. आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झाल्याचे मला आढळून आले नाही” असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी आज पत्रकात सांगितले.

द्विवेदी म्हणाल्या की, “अजित पवार यांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मते द्यायची हे सांगितले नाही. व्हिडिओमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचे ऐकू येते. विशिष्ट उमेदवार किंवा पक्षाला मत द्या, असे बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे हे कोणत्याही आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपण हा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पाठवला आहे. ते जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत आणि त्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाला देखील पाठवली आहे, असे टर्निंग ऑफिसर कविता द्विवेदी यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत