In the wake of the Lok Sabha elections a major operation of confiscation of liquor
जळगाव महाराष्ट्र राजकारण व्यसनमुक्ती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई

जळगाव, दि. 4 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 मे , 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना जमीनदोस्त केला असुन 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारु विक्री व निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हाभर वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कारवाया करणे सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक डी. एम. चकोर यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 4 मे, 2024 रोजी मध्यरात्री 2.30 वाजेसुमारस एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुवैदिक प्रोडक्ट या कंपनीत छापा मारला असता शितपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारु कारखाना सुरु असल्याचे व रॉकेट संत्रा नामक मद्याची अवैधरित्याअ निर्मिती करुन ते बाटलीत भरताना मिळून आले. या प्रकारणात एकूण पाच आरोपीना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 15 लाख 75 हजार किमंतीच्या 45 हजार सिलबंद रॉकेट संत्रा मद्याच्या बाटल्या, 30 लाख 30 हजार किमंतीच्या देशी मद्याचे भरलेले बॅरल, 3 लाख किमंतीच्या 1 लाख रिकाम्या बाटल्या, 6 लाख किंमतीचे लेबल पट्टी मशिन, 6 लाख किंमतीचे बुच सिल बंद करण्याचे मशिन, 5 लाख रुपये किंमतीचे पाणी शुद्धीकरण मशिन, 4 लाख 50 हजार किंमतीचे चार चाकी वाहन यासहल किरकोळ व इतर साहित्य असा एकूण 75 लाख 64 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही राज्य उत्पादक शुक्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यंवशी, प्रसाद सुर्वे, उपआयुक्त उषा वर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शना खाली निरिक्षक डी. एम. चकोर, एस.बी. चव्हाणके, दुय्यम निरीक्षक एस.बी.भगत, सी.आर.शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, गिरीष पाटील, सुरेश मोरे, पी.पी.तायडे, दिनेश पाटील, गोकुळ आहिरे, धनसिंग पावरा, एस.आर.माळी, विपुल राजपुत, आर.टी.सोनवणे, व्ही.डी.हटकर, एम.एम.मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांच्या पथकाने केली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास डी.एम.चकोर हे करीत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत