मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की विरोधकांनी कितीही आपटा, आमचाच उमेदवार निवडून येणार. कोणी कितीही ताणाताणी करा, आरडाओरडा करा पण आम्हीच जिंकणार यात काही शंका नाही.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकांसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आपणच जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच सामंजस्याने, मोठ्या मनाने निवडणुका बिनविरोध कराव्यात असं प्रतिपादनही त्यांनी केलं आहे. ते म्हणाले, “विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला, ताणाताणी केली तरीही शेवटी आम्हीच जिंकणार आहे. शंकेचं वातावरण जरी निर्माण केलं तरी विरोधी पक्षाला यश मिळणार नाही. त्यामुळे सामंजस्याने, मोठ्या मनाने निवडणुका टाळता आल्या तर महाराष्ट्रावर फार उपकार होतील.”




