Strict lockdown in Nashik district from tomorrow

नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, काय सुरु आणि काय बंद राहणार, जाणून घ्या..

कोरोना नाशिक महाराष्ट्र

नाशिक : नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे या कालावधीत १२ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. किराणा माल, दूध, बेकरी आणि मिठाई दुकाने ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. यातून औषध, प्राणवायू निर्मिती उद्योगांना वगळण्यात आले आहे. अन्य उद्योग जे मनुष्यबळाची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करतील, केवळ त्यांना उद्योग सुरू ठेवण्याची मुभा असेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्यावर बैठकीत एकमत झाले. बुधवारी दुपारी १२ वाजेपासून ते २३ मेच्या रात्री १२ पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

काय सुरु राहणार? काय बंद राहणार?

 1. खासगी, सार्वजनिक वैद्यकीय सेवा, दवाखाने, औषध दुकाने २४ तास सुरू राहतील.
 2. नागरिकांना अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
 3. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाता येणार नाही. संबंधित दुकाने केवळ घरपोच सेवेसाठी खुली असतील. घरपोच माल पुरविण्याची जबाबदारी दुकानांवर आहे.
 4. दूध संकलन, वितरण सकाळी करता येईल. सायंकाळी पाच ते सात ही वेळ केवळ संकलनासाठी राहील.
 5. बस, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठी वापरता येईल.
 6. इ-कॉमर्सद्वारे घरपोच सेवा देणाऱ्यांना कोरोनाचा निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगावा लागेल.
 7. गॅस एजन्सीद्वारे घरपोच सिलिंडर वितरण सुरू राहील.
 8. सर्व बँका, पतसंस्था, टपाल कार्यालये नागरिकांसाठी सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत सुरू असतील.
 9. कृषी अवजारे, कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने कालमर्यादेत सुरू ठेवता येणार आहेत.
 10. अंत्यविधीसाठी २० आणि त्यानंतरच्या विधीसाठी १५ व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे.
 11. पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना इंधन मिळेल.
 12. लग्न सोहळा केवळ नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात करता येईल. तेव्हा पाचपेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही.
 13. सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, बगीचे बंद राहतील.
 14. शाळा, महाविद्यालय, शिकवणी पूर्णत: बंद राहील. ऑनलाइन शिक्षणास प्रतिबंध नाही.
 15. मंगल कार्यालये, स्वागत समारंभ, सभागृह, लॉन आणि तत्सम ठिकाणे बंद राहणार आहेत.
 16. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, नाट्यगृह, कला केंद्र, सभागृह बंद राहणार आहेत.
 17. ऑनलाइन सेवा सुरू राहतील.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत