सोलापूर : प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र अचानकपणे कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने देशभरातील कांद्याचे भाव कमी होणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन, शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे म्हणून एका शेतकरी पुत्राने राज्यापालांची भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. हे वेळ त्याने मेल करून मागितली आहे काय म्हटलं आहे या मेल मध्ये, महोदय, मी विरेश आंधळकर, रा – सौंदरे, ता – बार्शी, जि – सोलापूर. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये गावी परतावे लागले आहे. ही केवळ माझी एकटयाची परिस्थिती नसून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शहरामध्ये काम करणारी शिकणारी मुले आता गावाकडे परतलेली आहेत.
The farmer’s son asked for time to meet the governor
कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या
ट्विटर & फेसबुक फॉलो करा.
केंद्र आणि राज्य सरकारचा दुवा असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विरेश आंधळकर या युवा शेतकऱ्याने इमेलद्वारे वेळ मागितली. शेतकरी पुत्राला कांदा उत्पादकांवर अन्याय होत असताना भेटीसाठी वेळ देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
Share this :
कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी […]
जळगावच्या महिला वसतीगृहात पोलिसांनी महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संतापजनक प्रकारची दखल आज विधीमंडळात घेण्यात आली. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावून त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या […]
लातूर : नांदेडहून लातूरकडे येणारी बस नांदगाव पाटीजवळ पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. हा अपघात दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला. एसटी बसच्या चालकाने दुचाकीला वाचवण्याच्या नादात अचानक दिशा बदलली, ज्यामुळे बस उलटली. हा अपघात दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास झाला. या दुर्घटनेमुळे बसमधील 37 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. […]