Devendra Fadnavis
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आम्ही सरकारसोबत आहोत – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. त्यासंदर्भात पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कि, “आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही.”

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार सध्या तीन पर्यायाने विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतोय. आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“सोमवार, मंगळवारपर्यंत ड्राफ्ट तयार करुन तो मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवायचा आहे. या कायद्याला स्थगिती देता येत नाही, मग त्याठिकाणी आपण कमी पडलो का ? असेही ते यावेळी म्हणाले तसेच पुन्हा घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ. मराठा आरक्षण कसं बहाल करता येईल, त्यासाठी प्रयत्न करु असं आम्ही सरकारला सांगितलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत