संगमनेर : व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सोमनाथ गिते यांचा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गिते यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष साहाय्यक विभाग व यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव येते झालेल्या व्यसनमुक्ती संमेलनात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२ देऊन गौरवविण्यात आले होते. याबद्दल थोरात यांनी संगमनेरातील त्यांच्या सुदर्शन या निवास्थानी सोमनाथ व अश्विनी गिते यांचा सत्कार करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या..
या वेळी शिबलापूरचे माजी सरपंच दिलावर शेख, प्रमोद बोंद्रे (ग्रामपंचायत सदस्य), सौ. यमुना नागरे (ग्रामपंचायत सदस्य), डॉ. संजय सांगळे, रावसाहेब नागरे, बापूसाहेब पाबळ, सुभाष मुन्तोडे,नंदू किशोर वालझाडे, ज्ञानदेव नागरे, माजी प्राचार्य आनंदराव गिते, प्रवीण नागरे, अश्विनी गिते, संतोष गिते आदी उपस्थित होते.