Somnath Gite awarded De-addiction Pride Award 2022
पुणे महाराष्ट्र सोलापूर

सोमनाथ गिते यांना २०२२ व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान

पुणे, ता.२३ : मागील काही वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर लेखन करणाऱ्या सोमनाथ गिते यांना २०२२ चा व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करण्याचे काम गिते यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२’ त्यांना देण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Somnath Gite awarded De-addiction Pride Award 2022
सोमनाथ गित्ते यांना व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार 2022 प्रदान करताना आमदार राजेंद्र राऊत व मान्यवर…

बार्शी तालुक्यातील जामगाव येथे झालेल्या व्यसनमुक्ती संमेलनात बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत भदाने, तर उद्घाटक माजी मंत्री दिलीपराव सोपल हे होते. स्वागतध्यक्ष सुरेश लोमटे, यश मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे तसेच डॉ. बी. वाय. यादव, डॉ. पल्लवी तांबारे, डॉ. रामचंद्र जगताप आदी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत