Man Drowns

पुणे : कालव्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दाम्पत्याचा बुडून मृत्यू

पुणे महाराष्ट्र

पुणे : पाण्यात बुडणाऱ्या आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एक महिला आणि तिचा पती यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी मुठा कालव्यात घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी भागातील हे कुटुंब कालव्याजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्यांचा एक मुलगा रणजीत पोहण्यासाठी कालव्यात उतरला आणि अचानक बुडू लागला. त्याची आई सोनी कश्यप यांनी त्याला बुडताना पाहिले आणि पोहता येत नसतानाही त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता त्याला वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली. त्यानंतर पत्नी आणि मुलगा दोघेही धडपडत असल्याचे पाहून वडील अशोक कश्यप यांनीही त्यांना वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली आणि त्यांना मुलाला वाचवण्यात यश आले.

मात्र, त्यांची पत्नी अजूनही पाण्यातच होती, त्यामुळे अशोक यांनी तिला वाचवण्यासाठी पुन्हा उडी मारली, मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने दोघेही कालव्यातील पाण्यात बुडाले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अशोक यांचा शोध सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत