सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीतील जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल चिंता व्यक्त करून महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन येथील मिटींग हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुभाष […]
टॅग: solapur
राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सोलापूर : राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांगोला येथे आयोजित भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या […]
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सोलापूर : आज सकाळी सुमारे ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र सांगोला तालुक्यात जमिनीपासून ५ किमी खाली असल्याचे समजले आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, काहींनी घराच्या बाहेर धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, […]
शिक्षकाची पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करून आत्महत्या, सोलापूरच्या बार्शी शहरातील धक्कादायक घटना
सोलापूर : एका शिक्षकाने पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या बार्शी शहरात घडली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. अतुल मुंडे (वय 38) असे पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अतुल यांची पत्नी तृप्ती मुंडे (वय 37) देखील शिक्षिका होती. मिळालेल्या माहितीनुसार, […]
सोलापुर : नाश्ता बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, तिघांचा होरपळून मृत्यू
सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रुपम टेक्सटाइल्सच्या पहिल्या मजल्यावर काही वेळापूर्वी आग लागली होती. येथील कामगार नाश्ता बनवत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. पहिल्या मजल्यावर कारखान्यातील काही सामान असल्याने आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. यावेळी दोनजण तात्काळ बाहेर आले, मात्र तीन कामगारांना बाहेर पडला आले नाही. त्यांच्या आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, आगीची […]
मोठी बातमी! आमदार राम सातपुते यांच्या कारला अपघात, गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राम सातपुते यांनीच फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे. […]
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे दोन वर्षांसाठी तडीपार
सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले आहेत. उपमहापौर राजेश काळे हे भाजपचे निलंबित नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण असे सात गुन्हे दाखल आहेत. सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना राजेश […]
‘या’ जिल्ह्यांमध्ये काही वेळात 30-40 किमी प्रतितास तीव्रतेच्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि मुंबई येथे पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास इतक्या तीव्रतेने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर […]
सोलापूर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट
सोलापूर : सोलापूर येथील श्री मार्कंडेय रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, श्री मार्कंडेय हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजनचा प्लांट असून प्लांटच्या दोन टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी बंद पडलेली आहे. या […]
पंढरपूर जवळ बोलेरोचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही बोलेरो थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन महिला एक पुरूष आणि एक लहान मुल अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात […]